Ad will apear here
Next
भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जींना अर्थशास्त्राचे नोबेल
एस्थर डुफ्लो, मायकेल क्रेमर यांच्यासह सन्मान

नवी दिल्ली : यंदाचे अर्थशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषिक भारतीय वंशाचे अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्थर डुफ्लो आणि सहकारी मायकेल क्रेमर यांना जाहीर झाले आहे. जागतिक स्तरावर गरिबी हटवण्यासाठीच्या प्रायोगिक दृष्टिकोनासाठी त्यांना हे पारितोषिक देण्यात आले असल्याचे रॉयल स्वीडिश अॅकॅडमीने सोमवारी जाहीर केले.

अभिजित बॅनर्जी
‘या तीन शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे जागतिक पातळीवर गरिबीशी सामना करण्यासाठी नवीन दृष्टिकोन मिळाला आहे. शिक्षण, मुलांचे आरोग्य यावर प्रभावी पद्धतीने काम करून गरीबीवर मात करण्याचा दृष्टिकोन त्यांनी दिला आहे. भारतासह त्यांनी केनियासारख्या अनेक देशांमध्ये प्रायोगिक दृष्टीकोनातून विविध प्रकल्प राबवून आर्थिक विकास घडवत असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या वीस वर्षांत त्यांच्या नवीन प्रायोगिक दृष्टिकोनामुळे आर्थिक विकासाची दिशा बदलली आहे. आणखी नवीन संशोधनाची क्षेत्रे यामुळे खुली झाली आहेत,’ असे नोबेल समितीने म्हटले आहे. 

५८ वर्षीय अभिजित बॅनर्जी मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत आहेत. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली. २००३मध्ये त्यांनी एस्थर डुफ्लो आणि एस. मुलायनाथन यांच्याबरोबर अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब स्थापन केली. ते या संस्थेचे संचालक असून, अमेरिकेतील विकास धोरणासंदर्भातील समितीवरही त्यांनी काम केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZWSCF
Similar Posts
‘एआयआयबी’ची भारतात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) भारताला आतापर्यंत सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा अर्थपुरवठा केला आहे. बँकेने भारतातील गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला आहे.
धारणा बदलताहेत.. यंदाच्या एक, दोन नाही तर पाच प्रमुख सौंदर्य स्पर्धांचं विजेतेपद कृष्णवर्णीय सौंदर्यवतींनी पटकावलं. फक्त गौर वर्ण म्हणजे सौंदर्य नाही; सौंदर्याची व्याख्या खूप वेगळ्या पद्धतीने करता येते, हे या तरुणींनी दाखवून दिलं. त्यामुळे समाजातील जुनाट धारणा आजची स्त्री बदलून टाकेल, असा विश्वास निर्माण होत आहे....
पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे यांचे युरोपातील आइस स्केटिंग स्पर्धेत यश पुणे : इंटरनॅशनल स्केटिंग युनियनतर्फे युरोपातील बेलारूस येथे घेण्यात आलेल्या आइस स्केटिंग स्पर्धेत पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे या दोघांनी यशस्वी कामगिरी केली. पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात पाचशे, हजार आणि पंधराशे मीटर स्केटिंगचे टप्पे यशस्वीपणे पार करत ओमने बेलारूस करंडक पटकावला. १९ वर्षांखालील गटात स्वराली देवने करंडक जिंकला
भारतात गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक पुणे : ‘भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध दोन्ही देशांच्या प्रगतीला पूरक आहेत. व्यवसाय, शिक्षण, आयटी, संशोधन, आरोग्य, बांधकाम अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक आहोत. महाराष्ट्रात जपानी कंपन्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language